spa 
ग्लोबल

America: मसाज पार्लरमध्ये अंदाधुंद गोळीबार; 4 आशियाई महिलांसह 8 जणांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकाच्या (America) अटलांटामध्ये तीन मसाज पार्लरमध्ये (Massage Parlors Shooting)  अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी कमीत कमी 4 आशियाई मुळ असलेल्या महिला आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जॉर्जिया (Georgia) राज्याच्या अटलांटा शहरात तीन मसाज पार्लरांना निशाणा बनवण्यात आले. यातील दोन पार्लर समोरासमोर आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री चेरोकी काऊंटीतील एका मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात तीन लोकांना मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. काही वेळाने शहरातील अन्य दोन मसाज पार्लरांमध्ये गोळीबार झाला. यात पाच जणांना मृत्यू झाला आहे. हे दोन्ही पार्लर समोरा-समोर आहेत. या तिन्ही घटनांचा संबंध आहे का, याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. 

गोळीबाराचं कारण अस्पष्ट

एक अज्ञात व्यत्ती काळ्या रंगाच्या एसयूवीमध्ये बसून घटनास्थळी पोहोचला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यानंतर चेरोकी काऊंटी येथील पार्लवर गोळीबार झाला. चेरोकी काऊंटीचे पोलिस अधिकारी यांनी मृतांची पुष्टी केली आहे. तसेच तीन लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळू शकलेली नाही. गोळीबार का झाला याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

फेसबुक पोस्ट करण्यात आले फोटो

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय की, संदिग्ध व्यक्ती पार्लरच्या जवळ आपली कार थांबवतो. त्यानंतर तो पार्लरमध्ये जाऊन लोकांवर गोळीबार सुरु करतो. पोलिस या हल्लेखोराचा शोध घेत होते. पोलिसांनी फेसबुकवर संदिग्ध गाडी आणि हल्लेखोरोचा फोटो पोस्ट केला होता. या व्यक्तीला कुठे पाहिले असल्याचं माहिती देण्यात सांगण्यात आलं होत.  गोळीबारानंतर ट्रॅफिक जॅम झाले होते. अखेर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT